भारत हा असा देश आहे जेथे लोकांना चमचमीत खायला फार आवडते. येथे लोक रस्त्याच्या कडेला बनणारे स्ट्रीट फूड देखील मोठ्या प्रमाणात खातात. तसेच काही लोक घरी आठवड्यातून एक दिवशी विशेष पदार्थ बनवून खात असतात.
पदार्थ कोणता ही असो एक गोष्ट जी आपण जवळपास प्रत्येक पदार्थांसोबत लावून खातो ती म्हणजे टोमॅटो सॉस. सर्व चमचमीत पदार्थ जे आपल्याला खायला आवडतात त्या सोबत आपण टोमॅटो सॉस हमखास वापरत असतो.
वडापाव, फ्रेंच फ्राईज, सँडविच या सारखे अनेक पदार्थ खाताना आपण टोमॅटो सॉस नक्की वापरतो. वर्षातील १२ ही महिने टोमॅटो सॉस हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. म्हणून आज आपण टोमॅटो सॉस बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करायचा आणि याद्वारे पैसे कसे कमवायचे हे पाहणार आहे.
टोमॅटो सॉसची डिमांड काय आहे?
टोमॅटो सॉस हा असा पदार्थं आहे जो हॉटेल्समध्ये तसेच घरामध्ये देखील जेवणा सोबत मोठ्या प्रमाणात वापरला जातो. वर्षातील १२ ही महिने याची डिमांड असते. भारतातील प्रत्येक घरात तुम्हाला टोमॅटो सॉसची बाटली किंवा पुडी नक्की पहायला मिळेल.
cnbctv 18 च्या माहिती नुसार भारतात सॉसचे मार्केट 2021 पर्यंत 21,700 कोटी रुपये इतके मोठे होते आणि 2026 पर्यंत जवळपास 30,000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात टोमॅटो सॉसची वाढती डिमांड पाहता हा व्यवसाय करणे फायदेशीर ठरु शकते.
व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी
टोमॅटो सॉस बनवण्याचा हा व्यवसाय सुरु करण्यासाठी भांडवल, मशीन, जागा आणि मनुष्यबळाची आवश्यकता आहे.
1. भांडवल –
या व्यवसायात तुम्हाला सुरुवातीला २ लाख रुपये भांडवल लावावे लागेल. हा सुरुवातीचा खर्च म्हणजे तुमचा मशीन खरेदी करण्याचा खर्च असेल. या व्यतिरिक्त माणसांचा पगार, टोमॅटो, कच्चा माल, जागेचे भाडे हा सर्व खर्च ५ लाख सुरुवातीच्या काही महिन्यांसाठी होईल.
या व्यवसायात तुम्ही २ लाख तुमच्या खिशातून लावू शकता आणि बाकीचे ५ लाख रुपयांसाठी लोन करु शकता. कोणत्या ही बँकेकडून तुम्हाला मुद्रा लोन सहज मिळेल.
2. मशीन –
टोमॅटो सॉस या व्यवसायात टोमॅटो पासून सॉस तयार करण्यासाठी काही मशिनींची आवश्यकता असते. या मशीन मॅन्युअल, सेमी ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक पद्धतीमध्ये मिळतात.
टोमॅटो सॉस बनवण्याची मशीन तुम्हाला १ ते २ लाखांपर्यंत मिळून जाईल. ही मशीन खरेदी करण्यासाठी तुम्ही ऑनलाईन वेबसाईटचा वापर करु शकता.
मशीन पहा – Tomato sauce making machine
3. जागा –
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला जास्त जागेची आवश्यकता नसते. तुम्ही पाहिजे तर तुमच्या घरुन देखील हा व्यवसाय चालू करु शकता. फक्त तुम्हाला काम करताना अडचण होणार नाही ऐवढी जागा हवी.
पण जर तुम्हाला दुसरीकडे जागा घेऊन हा व्यवसाय चालू करायचा असेल तर किमान 300 ते 500 स्क्वेअर फूट जागा असणे आवश्यक आहे. या जागेमध्ये मशीन ठेवून तुम्ही तयार केलेला माल देखील चांगल्या प्रकारे स्टोअर करु शकता.
4. मनुष्यबळ –
या व्यवसायात काही प्रमाणात मनुष्यबळ असणे देखील गरजेचे असते. तसेच अशा व्यक्तींची देखील गरज असते ज्यांना टोमॅटो सॉस मशीन ऑपरेट करता येईल. तुम्ही हा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणात सुरु करणार आहे त्या नुसार तुम्हाला लोकांची गरज पडेल.
पण व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान तुम्हाला १० माणसांची गरज पडेल.
टोमॅटो सॉस कसा तयार केला जातो?
- पहिल्यांदा तुम्हाला बाजारातून टोमॅटो घ्यावे लागतील. त्या नंतर ते स्वच्छ पाण्याने साफ करुन काही वेळ यांना गरम पाण्यात ठेवले जाते. त्या नंतर मशीनच्या साहाय्याने टोमॅटोच्या तुकड्यां मधून त्याचा सर्व रस काढला जातो.
- नंतर यामध्ये कांदा, काळी मिरी, मोहरी, लसूण या सर्व गोष्टी मिक्स केल्या जातात. मशीनमध्ये या सर्व गोष्टी काही वेळ मिक्स करत ठेवल्या जातात.
- मग टोमॅटो सॉस पूर्णपणे तयार होतो. मग याची पॅकिंग केली जाते.
टोमॅटो सॉसची विक्री कशी करायची?
तुमच्या टोमॅटो सॉसचा ब्रँड हा मार्केटमध्ये नवीन असल्यामुळे तुम्हाला विक्री करणे थोडे अवघड जाईल. त्यामुळे विक्री करण्यासाठी तुम्हाला आजूबाजूच्या हॉटेल्स आणि दुकान मालकांसोबत बोलावे लागेल.
तुमच्या ब्रँड विषयी लोकांना माहित व्हावे म्हणून तुम्ही गर्दीच्या ठिकाणी तुमच्या प्रॉडक्टचे बॅनर लावू शकता. तसेच आज लोक इंटरनेट मोठ्या प्रमाणात वापरतात. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन देखील जाहिरात करु शकता. ऑनलाईन जाहिरात करण्यासाठी तुम्ही फेसबुक आणि गूगल ऍड्सची मदत घेऊ शकता. यामुळे तुमचे प्रॉडक्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होईल.
हे पहा – फ्रीलांसिंग व्यवसायात आहे लाखो रुपये कमवण्याची संधी, असा सुरु करा व्यवसाय
कमाई किती होईल?
७ लाखांच्या गुंतवणुकीमध्ये सुरु केलेल्या या व्यवसायामध्ये जर तुम्ही चांगल्या प्रकारे मार्केटिंग केली तर वार्षिक उलाढाल ही २८ लाख होऊ शकेल. यामध्ये कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा सर्व मिळून खर्च हा २४ लाख होईल.
थोडक्यात वर्षाला तुम्हाला ४ लाख रुपये नफा होईल. म्हणजेच महिन्याला तुम्हाला ३० ते ३५ हजार रुपये नफा होईल. अशाच बिझनेस आयडिया मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇