हा एक असा मसाला आहे ज्याचा सुगंध देखील खूप चांगला आहे आणि त्यामुळे बाजारामध्ये हा फार महाग विकला जातो. हा मसाला महाग असल्यामुळे जेवण बनवण्यासाठी फार कमी प्रमाणात वापरला जातो. तसेच आपल्या देशातच नव्हे तर बाहेरील देशात देखील या मसाल्याची प्रचंड मागणी आहे.
त्यामुळे शेतामध्ये या मसाल्याचे उत्पादन घेतल्यास आपण हा मसाला बाहेरील देशामध्ये देखील Export करु शकतो. असे केल्यास वर्षांमध्ये आपण लाखो रुपये सहज कमवू शकतो.
२ हजार रुपये किलो विकला जातो मसाला
आम्ही ज्या मसाल्या बद्दल तुम्हाला सांगणार आहे त्याला वेलची किंवा इलायची असे देखील म्हणतात. प्रत्येक घरातील किचनमध्ये तुम्हाला ही सहज पहायला मिळेल. वेलचीमुळे जेवणाला स्वादिष्ट अशी चव येते. त्यामुळे बऱ्याचशा गृहिणी वेलची जास्त प्रमाणात वापरतात.
बाजारामध्ये आपल्याला वेलची २ हजार रुपये किलो दराने तर काही जागी चक्क ६ हजार रुपये किलो भावाने विकलेली देखील पहायला मिळते. त्यामुळे जर तुम्ही वेलचीचे उत्पादन घेतले तर तुम्ही लाखांमध्ये कमवाल यामध्ये काही शंकाच नाही.
अशा प्रकारे घ्या वेलचीचे उत्पादन
वेलची लागवडीसाठी चिकणमाती चांगली मानली जाते पण तुम्ही काळ्या जमिनीत देखील वेलचीची लागवड करु शकता. वेलचीच्या शेतात पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था असावी. तसेच वेलची लागवडीसाठी १० ते ३५ अंश तापमान चांगले मानले जाते. वेलची लागवड सुरु करण्यासाठी पावसाळा हा उत्तम काळ मानला जातो कारण पावसामुळे सिंचनाची गरज कमी पडते. जुलै महिन्यात तुम्ही शेतात वेलचीची रोपे लावू शकता.
सुरुवातीला नर्सरीमध्ये वेलचीची रोपे तयार केली जातात. नंतर मग ती शेतामध्ये लावली जातात. शेतात लागवड करण्यापूर्वी रोपाची उंची 2 ते 4 फूट होईल याची खात्री करा आणि मग लागवडी नंतर 3 वर्षांनी वेलची फळे येण्यास सुरुवात होते, ज्याची विक्री करुन आपण भरपूर नफा कमवू शकतो.
किती होईल नफा
वेलचीचे रोप परिपक्व होण्यासाठी ३ ते ४ वर्षे लागतात. वेलचीचे उत्पादन हेक्टरी १३५ ते १५० किलो असू शकते. काढणीनंतर ते अनेक दिवस उन्हात वाळवले जातात. त्या नंतर १८ ते २४ तास गरम तापमानात सुकल्यानंतर ते हाताने, कॉयर मॅटने किंवा वायरच्या जाळीने घासले जाते. मग ते आकार आणि रंगानुसार क्रमवारी लावले जातात.
हे पहा – या व्यवसायात सध्या नाही कोणत्या प्रकारचे कॉम्पिटिशन, आजच सुरु करा नाही तर भविष्यात होईल पश्चात्ताप
वेलची बाजारात ११०० ते २००० रुपये किलो दराने विकली जाते. अशा प्रकारे तुम्ही त्याच्या लागवडीतून लाखोंची कमाई करु शकता.
अशा प्रकारच्या नवीन व्यवसायाची माहिती मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇👇