आपल्यामधील बरेच जण PC किंवा लॅपटॉप वापरतात. त्याचा वापर ते अनेक कारणांसाठी करत असतात. जसे कि एखादे Office work करणे, Movies किंवा Videos पाहणे, Music एकणे या सारख्या कामांसाठी त्याचा वापर करत असतात.
ज्या Movies किंवा Videos पाहून झाल्या आहेत किंवा अनावश्यक गोष्टी ज्याची गरज नाही त्या गोष्टी आपण PC मधून Delete करुन टाकतो. पण काही वेळाने delete केलेल्या एखाद्या गोष्टीची आपल्याला गरज पडते आणि आपण ते एका सॉफ्टवेअरच्या साहाय्याने पुन्हा Restore करतो ज्याला Recycle bin असे म्हणतात.
Recycle bin मुळे आपण Delete केलेल्या गोष्टी हव्या असल्यास एका क्लिक वर पुन्हा Restore करु शकतो. हि सुविधा लॅपटॉप किंवा PC वापरकर्त्यांना फार फायद्याची ठरते.
पण काय होईल जर हीच सुविधा तुम्ही फोनमध्ये देखील वापरु शकला तर तुम्हाला हव्या असलेल्या सर्व गोष्टी तुम्ही पुन्हा एका क्लिकमध्ये Restore करु शकता.
हि सुविधा फोनमध्ये कशी वापरायची या विषयी मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे.
Android फोनमध्ये Recycle bin ची सुविधा कशी वापरावी|Recycle bin marathi
Recycle bin हि सुविधा फोनमध्ये वापरण्यासाठी आपण एका अँपची मदत घेणार आहोत.
हे अँप कोणते आहे व त्याच्या मदतीने आपण कशा प्रकारे Delete केलेल्या गोष्टी Restore करु शकतो या विषयी आपण खाली Step by step पाहूया.
स्टेप १ : तुम्हाला पहिल्यांदा Play store वरुन Dumpster नावाचे अँप डाउनलोड करावे लागेल.
स्टेप २ : अँप Install केल्यानंतर ते ओपन करा. तुमच्या समोर खालील पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला Basic आणि Premium असे दोन option मिळतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही Premium Version देखील खरेदी करु शकता.
फ्री मध्ये वापरण्यासाठी or try limited version बटन वर click करा.
स्टेप ३ : आता वरील Option वर click करुन तुम्ही Select करु शकता कि तुम्हाला कोणत्या गोष्टींसाठी Recycle bin वापरायचं आहे. म्हणजे तुम्ही त्या गोष्टी Select करु शकता ज्या Delete झाल्यानंतर तुम्हाला Dumpster अँपमध्ये हव्या आहेत.
आता तुमच्या फोनमध्ये Dumpster अँपच्या साहाय्याने Recycle bin हि सुविधा चालू झाली आहे.
तुम्ही ज्या गोष्टी select केल्या आहेत त्या तुम्हाला आता delete केल्यानंतर Dumpster अँपमध्ये दिसतील.
ह्या नवीन Feature मुळे तुम्हाला फार मदत होईल delete केलेल्या गोष्टी Restore करण्यासाठी
अशाच अँड्रॉईड टिप्ससाठी आपल्या ब्लॉगला Follow करा.
तुम्हाला हि माहिती कशी वाटली मला कंमेंटमध्ये सांगा.