Pesticide Shop Business: आता फक्त 10वी पास व्यक्ती देखील उघडू शकतो कीटकनाशक दुकान, कसे ते पहा

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

शेतामध्ये पिकांची फवारणी करण्यासाठी औषधे तसेच शेतामध्ये विविध प्रकारची खते टाकण्यासाठी आपल्याला ती कीटकनाशकाच्या दुकानातून आणावी लागतात. भारतामध्ये शेती ही मोठ्या प्रमाणात केली जाते त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकाच्या दुकानातून औषधे व खते खरेदी करतात.

त्यामुळे कीटकनाशकचे दुकान टाकणाऱ्या व्यक्तींची मोठ्या प्रमाणात कमाई होते. पण हे दुकान टाकण्यासाठी सुरुवातीला आपल्याकडे BSc ची डिग्री असणे आवश्यक होते. त्यामुळे केवळ BSc पूर्ण केलेल्या व्यक्तीच हे दुकान टाकून चांगले पैसे कमवू शकत होते.

पण आता कृषी विभागाने एक असा कोर्स आणला आहे जो केल्यानंतर आपण सहज कीटकनाशकचे दुकान टाकू शकतो. तसेच हा कोर्स फक्त १०वी पास व्यक्ती देखील करु शकतो. त्यामुळे ज्यांचे केवळ १०वी पर्यंत शिक्षण झाले आहे ते देखील हा डिप्लोमा केल्यानंतर स्वतःचे कीटकनाशक दुकान टाकून चांगले पैसे कमवू शकतात.

कोणता आहे हा डिप्लोमा?

DAESI Diploma (Diploma in Agricultural Extension Service for input Dealers) हा त्या व्यक्तींसाठी आहे ज्यांना स्वतःचे कीटकनाशक दुकान टाकायचे आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सरकारी लायसेन्स मिळते.

या कोर्समध्ये तुम्हाला शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या सर्व औषधांची माहिती दिली जाते तसेच त्यांचा वापर केव्हा व कशासाठी केला जातो या विषयी माहिती दिली जाते. DAESI Diploma भारतातील सरकारी आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

हे पहा – २ लाख रुपये गुंतवून हा व्यवसाय सुरु करा आणि महिन्याला ३० हजार रुपये कमाई चालू करा

कमाई कशी होईल?

DAESI Diploma पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वतःचे कीटकनाशक दुकान टाकू शकता. शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकांची फवारणी करण्यासाठी रासायनिक खते आणि औषधांचा वापर करतात त्यामुळे कीटकनाशकाच्या दुकानात नेहमीच गर्दी असते.

गावात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुम्ही हे दुकान टाकू शकता. चांगल्या ठिकाणी दुकान टाकून तुम्ही महिन्याला ६० ते ७० हजार रुपये सहज कमवू शकाल.

मराठी बिझनेस आयडिया Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment