आपल्या फोनमध्ये बरेच असे Option असतात ज्या विषयी आपल्याला माहित नसते. ते Option फोनमध्ये का दिलेले आहे त्याचा उपयोग कशासाठी केला जातो हे कुणालाच माहित नसते. या मधील एक ऑप्शन म्हणजे Airplane mode.
Airplane mode म्हणजे काय आणि हे कशासाठी वापरले जाते (Airplane mode information in marathi). याचे फोनमध्ये मुख्य काम काय आहे या विषयी कुणाला माहित नसते.
आपण जेव्हा विमानात बसतो तेव्हा आपल्याला Airplane mode चालू करायला सांगितले जाते. हे का चालू करायला सांगितले जाते आणि जर आपण विमानामध्ये Airplane mode चालू केले नाही तर काय होईल?
मी तुम्हाला आज Airplane mode विषयी माहिती सांगणार आहे जेणे करुन तुम्ही हि माहिती इतरांना देखील सांगू शकता.
Airplane mode म्हणजे काय आणि हे कशासाठी वापरले जाते।Airplane mode information in marathi
Airplane मोड म्हणजे काय?
Airplane मोड अशी सुविधा आहे जी फोनमधील Wireless सुविधा बंद करुन टाकते.
जेव्हा आपण फोन मधील Airplane मोड चालू करतो तेव्हा Wifi व Bluetooth आपोआप बंद होते. पण जर आपल्याला हवे असल्यास आपण पुन्हा सेटिंगमध्ये जाऊन Wifi व Bluetooth चालू करु शकतो.
विमानामध्ये Airplane मोड वापरणे का गरजेचे आहे ?
Cellular enable फोन हा नेहमी आजूबाजूच्या towers सोबत Communicate करत असतो. जेणे करुन Connection चालू राहावे व आपल्याला चांगले Signal मिळावे. पण जेव्हा tower लांब होतो तेव्हा फोनला signal boost करावे लागते जेणे करुन Connection चांगले बनून राहावे.
अशा प्रकारचे Connection हे Airplane च्या sensor साठी खूप अडथळे निर्माण करते त्यामुळे कोणती दुर्घटना होऊ नये म्हणून सरकारने Airplane मोड विमानांमध्ये वापरणे सक्तीचे केले आहे.
आज विमानांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे त्यामुळे जर चुकून कुणाच्या फोन मधील Airplane मोड चालू राहिले तर कोणती दुर्घटना होणार नाही पण सुरक्षेसाठी Airplane मोड चालू करणे गरजेचे आहे.
Airplane मोड वापरण्याचे फायदे
तुम्ही जरी विमानातून प्रवास करत नसला तरी सुद्धा आपण रोजच्या जीवनात Airplane मोडचा वापर अनेक कारणांसाठी करु शकतो. याचा वापर फक्त फोन मधील Wireless कनेक्शन बंद करण्यासाठी होत नाही तर याचे इतर देखील फायदे आहेत.
आपल्या फोनमध्ये चांगले नेटवर्क मिळण्यासाठी आपला फोन हा कायम towers सोबत Communicate करत असतो. जेव्हा आपण tower पासून लांब जातो तेव्हा फोन हा tower सोबत Communicate करुन Connection चालू राहावे यासाठी Signal boost करतो. या सर्व कार्यात battery चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
जर तुमच्या फोनची battery संपत आली असेल किंवा battery power वाचवायची असल्यास तुम्ही Airplane मोड चालू करु शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा Airplane मोड चालू केल्यानंतर तुम्हाला कॉल किंवा message येणार नाहीत.
मला आशा आहे कि तुम्हाला आज Airplane मोड विषयी सर्व माहिती (Airplane mode information in marathi) मिळाली असेल. तुम्हाला याचा वापर कुठे करायचा आहे व कशासाठी करायचा आहे हे आता कळले असेल.
तुम्हाला Airplane mode विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी इंटरनेट वर दुसरीकडे जाण्याची आता गरज पडणार नाही. माझी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कंमेंटमध्ये सांगा.