जर तुम्ही नोकरी सोबत एक व्यवसाय करण्याचा विचार करत असाल किंवा मग फुल टाइम व्यवसाय करायचा असेल तर एक असा व्यवसाय आहे जो कमी भांडवल लावून सुरु करता येतो. हा व्यवसाय आहे कार अॅक्सेसरीजचा.
मार्केटमध्ये ज्या प्रकारे नवीन नवीन गाड्या येत आहेत त्या नुसार कार अॅक्सेसरीजची डिमांड देखील दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
कार अॅक्सेसरीज हा व्यवसाय तुम्ही कमी भांडवल लावून सुरु करु शकता. तसेच यामध्ये प्रॉफिट मार्जिन ४० टक्के ते ७० टक्क्यांपर्यंत आहे. या व्यवसायात प्रॉफिट जास्त असल्याने यामध्ये हिशोब देखील मोठ्या बिझनेस प्रमाणे ठेवावा लागतो.
ज्या वेळी कोणती ही व्यक्ती नवीन कार घेते तेव्हा ती दोन ठिकाणी नक्की जाते. पहिले ठिकाण म्हणजे मंदिर आणि दुसरे ठिकाण म्हणजे कार अॅक्सेसरीजचे दुकान.
आज जवळपास सगळ्या गोष्टी ऑनलाईन मिळत असल्यामुळे कार अॅक्सेसरीज देखील ऑनलाईन सहज मिळून जातात. परंतु, कार मालक या सर्व अॅक्सेसरीज ऑफलाईन म्हणजे प्रत्यक्ष दुकानातून बसवणे जास्त पसंद करतात.
त्यामुळे या व्यवसायामध्ये इतके प्रॉफिट आहे.
आता आपण हा व्यवसाय सुरु करण्यासाठी किती खर्च येईल तसेच हा व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते हे पाहूया.
कार अॅक्सेसरीज व्यवसाय सुरु करण्यासाठी खर्च आणि आवश्यक घटक –
- हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्या जवळ 300 ते 500 चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे.
- हा व्यवसाय सुरु करण्यासाठी दुकानाची जागा फार महत्वाची आहे. जर तुमचे दुकान चांगल्या ठिकाणी असेल तर तुमचा माल जास्त प्रमाणात विकला जाईल.
- तुम्हाला ग्राहकांशी म्हणजेच कार मालकाशी चांगल्या प्रकारे बोलता आले पाहिजे जेणे करुन तुमचे त्यांच्याशी एक चांगले नेटवर्क तयार होईल.
- व्यवसाय सुरु करण्यासाठी कार अॅक्सेसरीजचा माल तुम्ही दोन प्रकारे घेऊ शकता. एक म्हणजे घाऊक विक्रेत्यांकडून (यामध्ये तुम्हाला जास्त मार्जिन मिळणार नाही) आणि दुसरे म्हणजे उत्पादकांकडून (जवळपास सर्व उत्पादक कार अॅक्सेसरीज ऑनलाईन विकत असतात तुम्ही तेथून माल खरेदी करु शकता व यामध्ये तुम्हाला प्रॉफिट मार्जिन देखील जास्त मिळते.)
- उत्पादकांशी थेट संपर्क साधून तुम्ही माल खरेदी करु शकता व हे उत्पादक तुम्हाला ३० ते ६० दिवसांपर्यंत क्रेडिटही देतात.
- डायरेक्ट उत्पादकांशी माल खरेदी करण्याचा दुसरा फायदा म्हणजे एखादा माल जर खराब निघाला तर ते पुन्हा रिटर्न देखील घेतात.
- या व्यवसायात तुम्हाला ४ ते ५ कामगार म्हणजे इलेक्ट्रिशियन, डेंटर, फिटर आणि हेल्पर यांची आवश्यकता असते.
- कार अॅक्सेसरीज व्यवसाय सुरु करताना तुमचा जास्त खर्च हा दुकान घेण्यासाठी होतो. एखाद्या चांगल्या ठिकाणी जेथे कारचे मोठ्या प्रमाणात काम केले जाते अशा ठिकाणी दुकान घ्यायला तुम्हाला महिन्याला ४० हजार ते १ लाख रुपये द्यावे लागू शकतात.
- यामध्ये दुसरा मोठा खर्च हा कामगारांचा पगार देण्यासाठी होतो. इलेक्ट्रिशियनला २५ हजार ते ३० हजार, तर एका डेटरला २० ते २५ हजार रुपये द्यायला लागू शकतात.
- बाकीचा खर्च हा दुकानात माल खरेदी करण्यासाठी होतो. संपूर्ण व्यवसायात पैसे लावल्यानंतर सुरुवातीला तुमच्याकडे १ लाख रुपये अतिरिक्त शिल्लक असायला हवे. जेणे करुन जर त्या महिन्यात प्रॉफिट कमी झाला तर कामगारांचे पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे शिल्लक राहतील.
हे वाचा – 10वी पास व्यक्ती देखील उघडू शकतो कीटकनाशक दुकान आणि कमवू शकतो भरपूर पैसे
कमाई किती होईल ?
कार अॅक्सेसरीजच्या व्यवसायामध्ये वस्तूंच्या किमती या फिक्स नसतात. मार्केट मधील चढ उतारानुसार येथे वस्तूंच्या किमती बदलत राहतात.
कार अॅक्सेसरीज व्यवसायातील मार्जिन हे जवळपास ४० ते ७० टक्क्यांपर्यंत आहे. जर तुम्ही चांगल्या ठिकाणी दुकान घेऊन ५ लाखांच्या आसपास गुंतवणूक केली तर तुम्ही महिन्याला सहज २ ते ३ लाख रुपये कमवू शकता.