ही गाय रोज देते ८० ते ९० लिटर दूध, दिवसाला होईल ४ हजारांची कमाई – कसे ते पहा

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

दूध ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येक घरात गरजेची असते. घरामध्ये चहा किंवा कॉफी बनवण्यासाठी तसेच लहान मुलांची रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी त्यांना दूध प्यायला दिले जाते. प्रत्येक घरामध्ये दुधाची गरज असते त्यामुळे जर तुम्हाला देखील व्यवसाय सुरु करायचा असेल तर दूध विक्रीचा व्यवसाय काही वाईट नाही.

तुम्हाला फक्त गाई सांभाळायची आहे आणि तिच्या पासून मिळणारे दूध लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे. जर तुम्हाला देखील हा व्यवसाय सुरु करायचा असेल तर मग आज आम्ही तुम्हाला अशा गायीच्या जाती विषयी सांगणार आहे जी दिवसाला तब्ब्ल ८० लिटर दूध देते. ज्यामुळे तुम्हाला जास्त गाय पाळण्याची देखील गरज पडणार नाही आणि चांगली कमाई देखील होईल.

कोणती आहे ही गाय

जी गाय दिवसाला किमान ८० लिटर दूध देते तिला गीर जातीची गाय असे म्हणतात. या जातीच्या गायींना बहुतेक पांढरे, गडद लाल किंवा तपकिरी ठिपके असतात आणि मान सैल आणि लटकलेली असते. अशा प्रकारच्या गायांना स्वच्छ आणि थंड वातावरणात रहायला आवडते.

शुद्ध गीर गाईच्या दुधात कॅल्शियम, फॉस्फरस, भरपूर चरबी आणि पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. यामध्ये एक संयुग्मित लिनोलिक ऍसिड (सीएलए) हे एक महत्त्वाचे ऍसिड असते, जे खराब कोलेस्टेरॉल कमी करते त्यामुळे संपूर्ण हृदयाचे आरोग्य सुधारते. गीर गाईचे दुध शरीराला पोषक असल्यामुळे बाजारामध्ये हीच्या दुधाला फार मागणी आहे.

पालन करण्यासाठी आवश्यक गोष्टी

Gir cow farming

गीर जातीच्या गाईला थंड आणि स्वच्छ वातावरणाची सवय असल्यामुळे तुम्हाला तशी सुविधा करावी लागेल. या सोबतच अशा गाईचे पालन करण्यासाठी तुम्ही मुक्त गोठा देखील तयार करु शकता म्हणजे गाय त्या गोठ्यामध्ये फिरत राहील व तिला चांगले वाटेल.

गीर गायींना जितका चांगला आहार दिला जाईल, तितके चांगले दूध त्या देतील. गीर गाय चाऱ्यातील पौष्टिक पदार्थ खातात ज्यात मका, बाजरी, गहू, जव तांदूळ, भुईमूग, मोहरी, तीळ, जवस यांचा समावेश होतो. अशा प्रकारचे पौष्टिक पदार्थ तिला खाऊ घातल्यास ही गाय तुम्हाला दिवसाला ८० ते ९० लिटर दूध सहज देईल.

महिन्याला किती होईल कमाई

गीर गायीचे दूध बाजारामध्ये ६० ते १६० रुपये लिटर दराने विकले जाते. हा रेट प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळा आहे. जर तुम्हाला एका गायीने दिवसाला किमान ८० लिटर दूध दिले आणि तुम्हाला फक्त लिटर मागे ६० रुपयेच दिले जातात असे मानले तर तुम्ही एका गायीच्या दुधापासून दिवसाला ४८०० रुपये कमवाल. अशा १० गाई जर तुम्ही सांभाळल्या तर दिवसाला ४८ हजार रुपये तर सहज कमवाल.

हे पहा – ४ लाखांच्या मशीनने महिन्याला होईल ५० हजारांची कमाई, १२ ही महिने चालेल व्यवसाय

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढे दूध विकायचे कुठे? हे दूध तुम्ही हवे तर दूध डेअरीला विकू शकता. या व्यतिरिक्त शहरांमध्ये असे बरेच लोक असतात ज्यांना पगार खूप असतो आणि त्यांना स्वतःच्या शरीराची काळजी घेण्यासाठी पौष्टिक आहार घ्यायचा असतो. अशा लोकांना तुम्ही हे पौष्टिक दूध विकू शकता.

असे श्रीमंत लोक मोठ्या सोसायटीमध्ये राहतात त्यांना तुम्ही हवे तर सुरुवातीला चव पाहण्यासाठी एक लिटर दूध फ्री मध्ये देऊ शकता आणि जर त्यांना आवडले तर ते नेहमी तुमच्या कडूनच दूध खरेदी करतील.

अशाच नवीन बिझनेस आयडियाची माहिती दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment