Small Business Idea – ही मशीन भाड्याने देऊन महिन्याला कमवा २० ते ३० हजार रुपये, मशीनला राहील संपूर्ण वर्षभरात मागणी

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

पैसे कमवण्यासाठी नेहमी व्यवसाया वर काम करायला हवे असे काही नसते. तुम्ही व्यवसायातून वेगवेगळ्या मार्गाने देखील पैसे कमवू शकता. तुम्ही घरबसल्या काही मशीन या भाड्याने देऊन देखील चांगले पैसे कमवू शकता. अशा प्रकारच्या कमाईला व्यावसायिक Passive Income म्हणतात.

म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात काही काम करत नाही तर तुमचे पैसे तुमच्यासाठी काम करतात. अशा प्रकारचा व्यवसाय तुम्हाला झोपेत असताना सुद्धा भरपूर पैसे कमवून देतो. जर तुम्हाला देखील अशा प्रकारे पैसे कमवायचे असतील तर संपूर्ण माहिती नक्की वाचा.

Construction कामासाठी वापरली जाते मशीन

ज्या मशीन तुम्ही भाड्याने देऊन पैसे कमवाल त्या घराच्या किंवा बिल्डिंगच्या बांधकामासाठी जास्त प्रमाणात वापरल्या जातात. आता सध्या गाव असो किंवा शहर प्रत्येक ठिकाणी कंस्ट्रक्शनचे काम चालू आहे. प्रधानमंत्री आवास योजनांच्या घरापासून ते मोठ्या इमारतींचे काम सगळीकडे चालू आहे.

कंस्ट्रक्शन काम लवकर होण्यासाठी मशीनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. बऱ्याच मशीन या इलेक्ट्रिक आहेत. पण काही ठिकाणी लाईटीची कमतरता असल्याने तेथे चार्जिंग वर चालणाऱ्या मशीन वापराव्या लागतात आणि हीच तुमची बिझनेस आयडिया आहे.

४ ते ५ लाखांची करावी लागेल गुंतवणूक

तुम्हाला फक्त मार्केट मधून Cordless Tools खरेदी करावी लागतील. प्रत्येक मशीन ही १० हजारा पासून ते ३०-४० हजारापर्यंत मिळते. अशा प्रकारे सर्व टूल्स खरेदी करायचे झाल्यास ४ ते ५ लाखांमध्ये मिळून जातील. या टूल्सचा बॅटरी बॅकअप देखील चांगला असतो त्यामुळे काम करताना त्रास होत नाही. हे टूल्स तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केट मधून खरेदी करु शकता.

Cordless Tools

हे पहा – दिवसाला ५० हजार रुपयांचा माल बनवते ही मशीन, गावात किंवा शहरात देखील चालेल व्यवसाय

गुंतवणुकीवर मिळेल १०% प्रॉफिट रिटर्न

मार्केटमध्ये सध्या १० हजार रुपयांच्या मशीनचे दिवसाचे भाडे १०० रुपये आहे. हा रेट तुम्ही तुमच्या लोकेशनला चेक करु शकता. सर्व टूल खरेदी करण्यासाठी तुम्ही जेवढे पैसे गुंतवले आहेत त्याच्या १० टक्के रिटर्न तुम्हाला महिन्याला मिळतो. म्हणजे जर तुम्ही ४ लाखांमध्ये सर्व टूल्स खरेदी केले असतील तर १० टक्के रिटर्न नुसार या मशीन तुम्हाला महिन्याला ४० हजार कमवून देतील.

अशा प्रकारच्या नवीन बिझनेस आयडियाची माहिती दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment