ब्रेडचा वापर भारतात अनेक स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. हा एक असा पदार्थ आहे ज्याचा वापर चहासोबत खाण्यापासून ते सँडविच बनवण्यासाठी केला जातो, म्हणूनच ब्रेडला आज खूप मागणी आहे.
हा ब्रेड गहू किंवा कॉर्नचा वापर करुन तयार केला जातो आणि त्यात अनेक पोषक तत्वे देखील असतात. गाव असो किंवा शहर प्रत्येक ठिकाणी ब्रेडची मागणी आपल्याला वाढताना दिसते, अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने ब्रेडचा व्यवसाय केला तर तो त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतो.
ब्रेड बनवण्यासाठी लागेल कच्चा माल
ब्रेड बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, पाणी, लोणी, मीठ, साखर, तेल, स्टार्च, शेंगदाण्याचे पीठ, कॉर्न फ्लोअर या सारख्या कच्या मालाची आवश्यकता असते. कच्चा माल घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही घाऊक बाजारात जाऊ शकता. या सोबतच तुम्ही ऑनलाइन वस्तू खरेदी करु शकता, परंतु घाऊक बाजारात तुम्हाला सर्व वस्तू योग्य किमतीत मिळतील.
ब्रेड बनवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी मिळविल्या नंतर तुम्ही घरुन देखील ब्रेड बनवण्याचा व्यवसाय सुरु करु शकता. घरच्या घरी ब्रेड कसा बनवायचा हे तुम्ही खालील विडिओमध्ये पाहू शकता.
आवश्यक नोंदणी आणि परवाने
जर तुम्हाला ब्रेड बनवण्याचा व्यवसाय सुरु करायचा असेल तर तुमच्याकडे काही कागदपत्रे आणि व्यवसाय सुरु करण्यासाठी परवाना असणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI), जिल्हा उद्योग केंद्राकडून परवानगी, GST परवाना, अग्निशमन विभाग परवाना, प्रदूषण विभाग परवाना आणि औद्योगिक वीज कनेक्शन इत्यादी गोष्टींची आवश्यकता पडेल.
लागेल इतके भांडवल
जर तुम्ही हा व्यवसाय घरबसल्या सुरु केला तर तुम्हाला २०,००० ते ३०,००० रुपयांची गरज पडेल, कारण ब्रेड बनवण्यासाठी ओव्हन आणि कच्चा माल खरेदी करावा लागेल. या सोबतच जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर हा व्यवसाय सुरु केला तर तुम्हाला किमान ४ ते ५ लाख रुपये लागतील. कारण यासाठी लागणारी मशीन थोडी महाग आहे आणि मोठ्या प्रमाणावर काम करण्यासाठी तुम्हाला मशीनची गरज पडेल.
हे पहा – ही गाय रोज देते ८० ते ९० लिटर दूध, दिवसाला होईल ४ हजारांची कमाई
होईल इतकी कमाई
मार्केटमध्ये ब्रेडचे पॅकेट ५० ते १०० रुपयांना विकले जाते. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या मार्केट मधून ब्रेडचे भाव माहित करुन घेऊ शकता. जर तुम्ही दिवसाला केवळ १० ब्रेडचे पॅकेट विकले तरी ५०० ते १००० रुपये दिवसाला आणि महिन्याला ३० हजार रुपये कमवाल. तसेच जर तुम्ही मोठ्या स्तरावर हा व्यवसाय सुरु केला तर महिन्याला ४० ते ५० कमवू शकता.
अशा नवीन बिझनेस आयडिया दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇