आज डिजिटल युगात सर्व जण ऑनलाईन पद्धतीने काम करत आहेत. ऑफिसमध्ये असो किंवा घरी सर्वांचे काम हे आता लॅपटॉप वर चालू आहे. आपण दिवसाचे किती तास लॅपटॉप वर काम करत असतो हे सांगता येणे कठीण आहे.
ह्या कामामध्ये आपण कीबोर्डचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. आपण दिवसातून किती तरी वेळा कीबोर्डची बटणे दाबत असतो. कीबोर्ड हा लॅपटॉप मधील महत्वाच्या भागांपैकी एक आहे.
कीबोर्डचा नियमित वापर होत असल्यामुळे त्याच्या बटनांमध्ये बऱ्याचदा धूळ साचते. पण कीबोर्डची बटणे हि फार जवळ असल्याने त्यांच्या मधील धूळ काढणे खूप अवघड होते.
बरेच जण कीबोर्डला ओल्या फडक्याने पुसून धूळ काढण्याचा प्रयत्न करतात पण हे फार धोकादायक आहे. कारण जर थोडेसे जरी पाणी लॅपटॉपच्या मशीनमध्ये गेले तर लॅपटॉप बंद पडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते. असा लॅपटॉप नीट करण्यासाठी खर्च देखील मोठ्या प्रमाणात येऊ शकतो.
मी आज तुम्हाला कीबोर्ड साफ करण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहे ज्याच्या मदतीने तुम्ही कमी वेळेत कीबोर्ड साफ करु शकता.
आपल्या मधील बरेच जण जॉब करत आहेत त्याच्या मुळे सगळ्यांकडे वेळेची कमी असते. खालील कीबोर्ड साफ करण्याच्या सोप्या पद्धतींचा वापर करुन आपण स्वतःचा वेळ वाचवू शकतो.
How to clean keyboard in marathi
मी इथे तुम्हाला कीबोर्ड साफ करण्याच्या विविध पद्धती सांगणार आहे. यापैकी तुम्हाला जी पद्धत सोयीस्कर वाटेल त्या पद्धतीद्वारे तुम्ही कीबोर्ड साफ करु शकता.
१. मऊ रुमाल आणि ब्रश
एक मऊ रुमाल घ्या आणि त्या रुमालावर थोडेसे पाणी शिंपडा. तुम्हाला रुमाल जास्त ओला करायचा नाहीये. नंतर त्या रुमालाने सर्व कीबोर्डची बटणे चांगल्या प्रकारे पुसून घ्या. कीबोर्ड पुसताना बटनांवर थोडा जोर दिला तरी चालेल. पण जास्त जोर देऊ नका.
अशा प्रकारे कीबोर्डच्या बटनांवरील धूळ निघून जाईल. पण बटणांच्या खालच्या बाजूस धूळ तशीच राहील ती काढण्यासाठी एक ब्रश घ्या. आपण दररोज दात घासण्यासाठी जो ब्रश वापरतो त्या आकाराचा एक ब्रश घ्या आणि बटणांच्या मधून फिरवा.
आता बटणांच्या खालच्या बाजूला असलेली धूळ देखील निघून जाईल.
२. Vacuum Cleaner
Vacuum Cleaner च्या मदतीने तुम्ही कमी वेळेत चांगल्या प्रकारे कीबोर्ड साफ करु शकता.
हे तुम्हाला Amazon किंवा Flipkart वर मिळेल. ज्या प्रकारे घरातील धूळ साफ करण्यासाठी Vacuum Cleaner चा वापर करतात त्या प्रकारे कीबोर्ड मधील धूळ साफ करण्यासाठी कीबोर्ड vacuum cleaner चा वापर केला जातो.
३. Keyboard Protector
जर तुम्हाला कीबोर्ड साफ करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही कीबोर्ड वर keyboard protector लावू शकता. keyboard protector म्हणजे एक प्रकारचा cover असतो जो आपण लॅपटॉपच्या कीबोर्डला लावू शकतो.
हे लावल्यानंतर जी धूळ कीबोर्डवर येईल ती सगळी या कव्हर वर येईल. यामुळे तुमचा कीबोर्ड खराब होण्यापासून वाचेल. कीबोर्ड साफ करायच्या वेळेस तुम्हाला फक्त हा कव्हर साफ करावा लागेल.
वरील पैकी कोणती पद्धत तुम्ही वापरणार आहात हे मला कंमेंटमध्ये सांगा. वर दिलेल्या तीन पद्धतींपैकी जी पद्धत तुम्हाला कीबोर्ड साफ करण्यासाठी सोयीस्कर वाटते ती तुम्ही वापरु शकता.