आज इंटरनेटचा वापर करताना आपण कोणती ही काळजी न घेता वाटेल त्या Activity करत असतो. इंटरनेट वर आपण काही ही केले तरी ते कुणाला हि कळणार नाही असे आपल्याला वाटते. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा.
इंटरनेट वर काही हि सुरक्षित नाही
इंटरनेट वर आपला डेटा सुरक्षित रहावा म्हणून Two step verification हि नवीन सुरक्षा तयार करण्यात आली. २ स्टेप व्हेरीफिकेशन मुळे आपला डेटा सुरक्षित ठेवण्यास मदत होते.
आज आपण इंटरनेटचा वापर विविध कामांसाठी करतो. ज्यातील काही कामे हि इंटरनेट बँकिंगशी निगडित असतात. ज्यामध्ये आपण बँक अकाउंट डिटेल्स टाकतो. अशा वेळेस जर आपले बँक अकाउंट डिटेल्स कुणाला कळाले तर काय होईल हे आपल्या सर्वाना माहीतच आहे.
आपली वैयक्तिक माहिती जर हॅकर्सला मिळाली तर ते याचा गैरवापर करु शकतात. हॅकर्स पासून आपला डेटा किंवा वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी टू स्टेप व्हेरीफिकेशन फार महत्वाचे आहे.
आज मी तुम्हाला टू स्टेप व्हेरीफिकेशन काय आहे तसेच याचा फायदा काय आहे या विषयी माहिती सांगणार आहे.
२ स्टेप व्हेरीफिकेशन म्हणजे काय?।Two step verification in Marathi
टू स्टेप व्हेरीफिकेशन हि एक प्रकारची सुरक्षा भिंत आहे जी आपल्या बँकेची माहिती तसेच ई-मेल आयडी व पासवर्डला सुरक्षित ठेवते. टू स्टेप व्हेरीफिकेशनमुळे आपली इंटरनेट वरील सुरक्षा डबल होते.
टू स्टेप व्हेरीफिकेशनला आपण टू फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two Factor Authentication) असे देखील म्हणतो.
आपण इंटरनेट वर विविध वेबसाईटचा वापर करत असतो. ज्यातील काही वेबसाईटमध्ये आपल्याला ई-मेल आयडी व पासवर्ड टाकावा लागतो. आपण पासवर्ड लक्षात रहावा म्हणून बऱ्याचदा सगळीकडे एकच पासवर्ड टाकतो. पण असे करणे फार धोकादायक आहे.
जर हॅकर्सला तुमचा पासवर्ड कळला तर त्यांच्यासाठी तुमची सगळी वैयक्तिक माहिती चोरुन त्याचा गैरवापर करणे अगदी सोपे होते. असे होऊ नये म्हणून टू स्टेप व्हेरीफिकेशन वापरणे किंवा चालू करणे गरजेचे आहे.
२ स्टेप व्हेरीफिकेशन काम कसे करते?
जर तुम्ही टू स्टेप व्हेरीफिकेशनचा वापर करत असाल तर हे काम कसे करते हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.
जेव्हा आपण नवीन ई-मेल आयडी व पासवर्ड बनवतो. तेव्हा OTP(One Time Password) पाठवण्यासाठी आपला नंबर विचारला जातो. तेव्हा आपण जो नंबर देतो त्यावर आपल्याला एक कोड किंवा OTP येतो तो OTP जो पर्यंत आपण टाकत नाही तो पर्यंत आपल्याला लॉगिन होता येत नाही. अशा प्रकारे टू स्टेप व्हेरीफिकेशन काम करते.
अशा स्थितीत जरी हॅकरला आपला ई-मेल आयडी व पासवर्ड मिळाला तरी त्याला मोबाईल नंबर वर येणारा OTP टाकावा लागेल व हा OTP त्याला आपल्या शिवाय मिळू शकत नाही. म्हणजेच जरी त्याच्याकडे आपला ई-मेल आयडी व पासवर्ड असला तरी तो काहीच करु शकत नाही.
अशा प्रकारे टू स्टेप व्हेरीफिकेशनद्वारे आपले अकाऊंट सुरक्षित होते.
२ स्टेप व्हेरीफिकेशन वापरण्याचे फायदे व नुकसान
आता पर्यंत आपण टू स्टेप व्हेरीफिकेशन म्हणजे काय तसेच हे काम कसे करते हे पाहिले. आता आपण टू स्टेप व्हेरीफिकेशन वापरण्याचे आपल्यासाठी फायदे व नुकसान काय आहेत या विषयी पाहूया.
फायदे –
- आपल्या अकाऊंटची सुरक्षितता दुपटं करते.
- इतर कोणी लॉगिन करु शकत नाही.
- ऑनलाईन Transaction सुरक्षित करते.
नुकसान –
टू स्टेप व्हेरीफिकेशनचे सगळ्यात मोठे नुकसान हेच आहे कि जर तुमच्या जवळ तुमचा फोन नंबर नसेल ज्याचा वापर तुम्ही टू स्टेप व्हेरीफिकेशनसाठी केला होता तर तुम्हाला लॉगिन करण्यासाठी अडचण येऊ शकते.
कारण लॉगिन करण्या अगोदर OTP तुमच्या नंबर वर येईल आणि जर तुमचा फोन नंबर तुमच्या जवळ नसेल तर मग तुम्ही लॉगिन कसे काय करणार.
जर तुम्ही टू स्टेप व्हेरीफिकेशन चालू केले असेल तर फोन नंबर जपून ठेवा.
निष्कर्ष –
तुम्हाला जर तुमचे बँक अकाऊंट डिटेल्स तसेच ई-मेल आयडी व पासवर्ड सुरक्षित ठेवायचे असेल तर फोनमधील टू स्टेप व्हेरीफिकेशनची सुविधा नक्की चालू करा. मी आज तुम्हाला २ स्टेप व्हेरीफिकेशन(Two step verification in marathi) बद्दल जी माहिती सांगितली या विषयी तुम्हाला काही अडचण असल्यास मला कंमेंटमध्ये विचारु शकता.
जर तुम्हाला हा ब्लॉग व ह्या ब्लॉगवरील माहिती आवडत असल्यास हि माहिती इतरांसोबत Share करायला विसरु नका.