४ लाखांच्या मशीनने महिन्याला होईल ५० हजारांची कमाई, १२ ही महिने चालेल व्यवसाय

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

जर तुम्हाला असा व्यवसाय सुरु करायचा असेल ज्यामध्ये प्रॉडक्टची मागणी सगळीकडे असेल पण तो प्रॉडक्ट फार कमी लोक बनवतात. तर मग आजचा हा खास व्यवसाय फक्त तुमच्यासाठी. कारण या व्यवसायात वस्तू तयार करण्यासाठी ज्या मशीनची आवश्यकता असते ती सगळीकडे उपलब्ध नाही.

आम्ही तुम्हाला ज्या मशीन विषयी आज सांगणार आहे ती फक्त मोठ्या शहरांमध्येच पहायला मिळते. त्यामुळे तुम्हाला या व्यवसायात कॉम्पिटिशन फार कमी मिळेल.

कोणती आहे ही मशीन

आम्ही तुम्हाला ज्या मशीन विषयी सांगणार आहे तिला Artificial Flower Making Machine असे म्हणतात. मशीनचे नाव एकूण तुम्हाला कळले असेलच की ही आर्टीफिसिअल फुले तयार करते. अशा प्रकारची फुले ही प्लास्टिक पासून तयार केलेली असतात. ही फुले प्लास्टिक पासून तयार केली गेली असल्यामुळे ती खराब होत नाही व बरेच महिने या फुलांना वापरले जाऊ शकते.

artificial flower making machine

ही मशीन तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केटमध्ये २ ते ४ लाखांच्या आसपास मिळून जाईल. तसेच या मशीनला ठेवण्यासाठी जास्त जागेची देखील आवश्यकता नसते. मशीनच्या मदतीने आर्टीफिसिअल फुल कसे तयार केले जाते हे तुम्ही खालील विडिओमध्ये पाहू शकता.

१२ ही महिने असते मागणी

आर्टीफिसिअल फुलांचा वापर सण, लग्न समारंभ आणि विविध कार्यक्रमामध्ये सजावटीसाठी केला जातो. ही फुले आर्टीफिसिअल असल्यामुळे ती खराब होत नाही त्यामुळे सण किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा प्रकारची फुले ही गावात आणि शहरात दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

हे पहा –  ही मशीन भाड्याने देऊन महिन्याला कमवा २० ते ३० हजार रुपये

मिळते चांगले प्रॉफिट मार्जिन

Artificial Flower Making मशीनचा सर्वात मोठा फायदा हा आहे की तुम्हाला प्रॉडक्शन कॉस्ट फार कमी येईल. तसेच या मशीनच्या मदतीने तयार केलेल्या फुलांना अगोदरच मार्केटमध्ये खूप किंमत आहे. त्यामुळे तुम्हाला चांगले प्रॉफिट मिळेल. तुम्ही तयार केलेला माल डिस्ट्रिब्युटरद्वारे न विकता जर डायरेक्ट दुकानदारांना विकला तर तुम्ही संपूर्ण मार्केट स्वतःच्या मुठीमध्ये घेऊ शकता.

या मशीनच्या साहाय्याने तयार केलेला माल तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने विकू शकता त्यामुळे तुमचे प्रॉफिट किती तरी पटीने वाढवता येईल.

अशा प्रकारच्या नवीन बिझनेस आयडिया दररोज मिळवण्यासाठी आपला व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा 👇

मराठी बिझनेस Whatsapp ग्रुप जॉईन करा Join Now

Leave a Comment